आज बारावी (HSC) निकाल दुपारी 1 वाजता जाहीर !! निकाल येथे पहा ! Maharashtra HSC Board Result 2024

Maharashtra HSC Board Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातुर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाच्या फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी (HSC) परीक्षेच्या निकालाची तारीख काल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट वर कळविण्यात आले आहे. 12वी (HSC) परीक्षेचा निकाल हा आज दिनांक 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट पाहता येणार आहे. तसेच निकालाबाबतचा अन्य तपशील हा खाली सविस्तर उपलब्ध सुद्धा करून दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Maharashtra HSC Board Result 

या वेबसाईट वर पाहता येणार निकाल 

🌐 maharesult.nic.in

🌐 https://hscresult.mkcl.org

🌐 https://www.mahahsscboard.in

🌐 https://results.digilocker.gov.in

परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ऑउट) घेता येईल,त्याचप्रमाणे गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्यासाठी डीजीलॉकर अप्प्लीकेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अन्य निकालाबाबत तपशील : 

  1. ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी (HSC) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ठ विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकच्या छायाप्रती पुनर्मुल्यांकन संबधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://verification.mh.hsc.ac.in) स्वतः किवा कनिष्ठ महाविद्यालयीन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरतालिका छायाप्रती बुधवार दिनांक 22/05/2024 ते 05/06/2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
  2. फेब्रुवारी मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी (HSC) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छाया प्रत मिळाल्याच्या दिवसांपासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मुल्यांकच्या कार्य्पाध्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहिती शुल्क भरून संबधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील.
  3. फेब्रवारी मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी (HSC) परीक्षेत विषयांसह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांसाठी लगतच्या दोन संधी जुलै ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी मार्च 2025 श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहील.
  4. जुलै ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थांसाठी सोमवार दिनांक 27/05/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे.

आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहिर होणार असून हि बातमी सर्व बारावीच्या विद्यार्थांना व त्यांच्या पालकांपर्यंत शेअर करा व इतरांना सुद्धा पाठवा.