Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर संधी कशाला चुकवताय कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी एकूण 026 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात ले आहे, या भरती निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हा 22 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Google फॉर्म द्वारे अर्ज)
एकूण पदसंख्या : 026 रिक्त जागा
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कलाकार | 002 |
02 | अकाउंटंट कम डेटा एंट्री ऑपरेटर | 024 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची उच्च्य माध्यमिक शाळांत परीक्षा 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार बॅचलर ऑफ फाइन आर्ट (कमर्शियल आर्ट) पदवी परीक्षा, डिजिटल ग्राफिक्समध्ये डिप्लोमा विथ फोटोशॉप आणि कोरेल ड्रॉ संगणकात अभ्यासक्रम आणि संगणकावर कलाकृती तयार करण्याचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. iii) उमेदवाराने 1 वर्ष कालावधीचा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराने डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) 6 महिन्यांचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. iv) उमेदवार महाराष्ट्र शासनमान्य टंकलेखन परीक्षा मराठी 30 एससीपीएम आणि इंग्रजी 40 एससीपीएम उत्तीर्ण केलेला असावा. v) उमेदवारांनी “डी.ओ.ई., एसीसी सोसायटी (C.C.C) किंवा (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) पातळी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र धारक असावेत.
- पद क्र.02 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असावा. व उच्च्य माध्यमिक (HSC) परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची (B.COM) पदवी परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. iii) उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र वा तत्सम किवा उच्च परीक्षा 100 गुणांची मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iv) उमेदवारांकडे “डी.ओ.ई., एसीसी सोसायटी (सीसीसी) किंवा (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) लेव्हल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळ MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 40,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | लेखी परीक्षा |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
तिसरी फेरी | मुलाखत (Interview) |
नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 सप्टेंबर 2025 (सायं : 5.00 pm पर्यंत)
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवाराने जाहिरातीनुसार दिलेल्या कालावधीच्या आत गुगल फॉमद्वारे (Google Form) अर्ज करावा.
- कंत्राटी पध्दतीवर नेमणूक केलेल्या उमेदवारांची सेवा त्यांना पूर्वसुचना न देता संपुष्टात आणण्याचे आधिकार प्रशासनास राहतील यांची नोंद घ्यावी.
- कंत्राटी कालावधीत काम करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने त्यांची सदर सेवा सेवाजेष्ठतेसाठी विचारत घेतली जाणार नाही किंवा सदर सेवेला सेवाजेष्ठतेसाठी प्राधान्य देण्यात येणार नाही. तसेच, त्यांना नियमित पदावर हक्क सांगता येणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित पदावर नियुक्ती करण्यापूर्वी सोबत जोडलेल्या करारनाम्याच्या नमुन्या प्रमाणे 500/- रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा द्यावा लागेल.
- यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले व पोष्टाने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणर नाहीत तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यांदीचा अधिकार दिलेला नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
- जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
- मध्यस्थ/ठक/मुंबई महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासविणाऱ्या व्यक्ती यांचा गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या उमेदवारांना सूचना देण्यात येत आहेत. (Mumbai Mahanagarpalika Bharti 2025)
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त / कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना आहेत.
- गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
- उमेदवाराने एकदा अर्ज केल्यानंतर विहित वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतेही कागदपत्रे नंतर आणून दिल्यास ती कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत व त्यांचा अर्ज अपूर्ण समजून अपात्र ठरविण्यात येईल.
भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील. - वरिल पदे ही कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधन तत्वानुसार भरण्यात येणार असून सदरील नियुक्ती आदेश हे निर्गमित केलेल्या तारखेपासुन ते 179 दिवस पर्यंतच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत. पुढील पुनर्नियुक्ती आपल्या कामगिरी मुल्यांकनावर आधरित असेल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 | शैक्षणिक पात्रता -10वी/12वी उत्तीर्ण | Border Security Force Bharti 2025
हे पण वाचा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025 | Krushi Vidyapeeth Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.