Bhumi Abhilekh Bharti 2025 : भूमी अभिलेख विभाग भरती 2025 | मासिक वेतन : 63,200/- रुपये.

Bhumi Abhilekh Bharti 2025 : भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भुकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल ९२० जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bhumi Abhilekh Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0903  रिक्त जागा

भरती विभाग : भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत (Maharashtra Government)

पदांचे नाव व तपशील :   भुकरमापक (गट-ड)

पद क्र. विभाग / प्रदेशएकूण पदसंख्या 
01 पुणे प्रदेश ०८३
02कोकण प्रदेश, मुंबई२५९
03नाशिक प्रदेश124
04छ. संभाजीनगर21०
05अमरावती प्रदेश117
06नागपूर प्रदेश11०
 एकूण903

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा टंकलेखन प्रमाणपत्र

(टीप : टंकलेखन विषयक अहर्ता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षा आत सदर अहर्ता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील याची नोंद घ्यावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भूमी अभिलेख विभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग 1000/- रुपये 
राखीव प्रवर्ग900/- रुपये

(वर दर्शविण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंग शुल्क (लागू असेल तर) वगळून आहे. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाईल. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम हि ना परतावा असेल. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू असणार नाही.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी ऑनलाईन CBT परीक्षा
दुसरी फेरी मुलाखत
तिसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025 

MPSC BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

Bhumi Abhilekh Bharti 2025 Hand Declaration

I, (name of the candidate) hereby declare that all the information
submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठीभूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
  • संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेमध्ये शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ तसेच https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

हे पण वाचा : UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 457 जागांची भरती | येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo