SSC Result Declare 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) चा १०वी (SSC) परीक्षेचा निकाल ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
SSC Result Declare 2026 : संकेतस्थळ
- https://results.digilocker.gov.in
- https://mahahsscboard.in
- https://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://sscresult.mkcl.org/
या परीक्षेसाठी एकूण १६,१५,४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,६५,७४० मुले, ७,४९,७३६ मुली व १३ ट्रान्सजेंडर होती. एकूण २३६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५१११ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
SSC Result Declare 2026 : विषयनिहाय गुणांची पडताळणी ९ मे पासून
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार ८ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, पुणे, मुंबई, नागपूरसह नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी संकेतस्थळांवर उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांची पडताळणी ९ मे पासून करता येईल.
SSC Result 2026 निकाल कसा पाहावा (Step-by-Step):
- वरील अधिकृत वेबसाइटवर जा.
- SSC Examination Result 2026′ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
- ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
महत्त्वाची टीप : ऑनलाइन निकाल तात्पुरता (Provisional) असेल. मूळ गुणपत्रिका (Original Marksheet) काही दिवसांनी शाळेत मिळेल.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
