NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रासाठी स्टाफ नर्स व एम पी डब्लू या स्वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 093 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीच्या अनुषंगाने सदरील पदभरतीची जाहिरात,पदांची संख्या,आवश्यक शैक्षणिक अहर्ता,अनुभव,आरक्षण,नोकरीचे ठिकाण,अर्जाचा नमुना व अटी शर्ती हि संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध उपलब्ध करून दिला आहे. सदर भरती हि महानगरपालिका नियोजन करत असून त्याच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित केली आहे. तसेच सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक हा 26 जून 2024 असून इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.
NHM Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत
भरती श्रेणी : महानगरपालिका अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्टाफ नर्स | 047 |
02 | एम पी डब्लू | 046 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : उमेदवार कोणत्याही विद्याशाखेतून 12 वी उत्तीर्ण व G.N.M / BSC नर्सिंग उत्तीर्ण
- पद क्र.02 : उमेदवार कोणत्याही विद्याशाखेतून 12 वी उत्तीर्ण + Para Medical Basis Training Course or sanitary Inspector Course
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.150/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रु धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (jobs in Aurangabad)
निवड प्रक्रिया : मुलाखत
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : डाटा सेंटर,सिटी मार्व्हेल बिल्डींग निराला बाजार बस स्टाप शेजारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2024
NHM Recruitment 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना व अटी :
- वरील नमूद पदे हि राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत,सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
- उपरोक्त नमूद केलेले पद 11 महिने कंत्राटी तत्वावर करारद्वारे भरण्यात येत आहेत. सन 2024-25 च्या कृती आराखड्यामध्ये सदरच पदांची मंजुरी प्राप्त न झाल्यास वरील पदांची सेवा आपोआप संपुष्टात येईल.
- सर्व पदांसाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अहर्तेची कागदपत्रे तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक पदवी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र जात प्रमापात्र वय अधिवास वयाचा पुरावा हि सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरोक्स प्रतीत जोडावीत,नावात बदल असल्यास राजपत्र विवाह नोंदणी जोडणे बांधककारक राहील.
- अर्ज सादर करणे कामी व मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्याच्या सोयीनुसार ठिकाण बदलून मिळणार नाही. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरील नमुन्यांप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह धरला जाणार नाही.
- मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्याबाबत 100 रु.बॉंड पेपरवर करारनामा पदांवर रजू होताना सादर करावा लागेल.
- अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करावयचा असल्यास स्वत्रंत अर्ज व स्वत्रंत धनाकर्ष असणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी वरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !