BMC BHARTI 2025 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरती मध्ये एकूण 069 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि मुंबई महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.
BMC BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 069 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ सल्लागार | 01 |
02 | नेफ्रोलॉजिस्ट | 01 |
03 | रक्त संक्रमण अधिकारी | 01 |
04 | मेडिकल ओन्कोलॉजिस्ट | 02 |
05 | किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी | 01 |
06 | कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ | 01 |
07 | दूरध्वनी चालक | 01 |
08 | डेटाएन्ट्री ऑपरेटर | 30 |
09 | क्ष किरण सहायक | 10 |
10 | प्रयोगशाळा सहाय्यक | 18 |
11 | व्ही.सी. तंत्रज्ञ | 01 |
12 | ए. आर. सी. सल्लागार | 01 |
१३ | ऑर्थटिक तंत्रज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिएम/डिएनबी (Rheumatology) पदवी प्राप्त केलेला असावा. रुमेटोलॉजीमध्ये किमान 5 वर्षाचा क्लिनिकल अनुभव असावा.
ii) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
iii) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. iv)उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. - पद क्र.2 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिएम / डिएनबी (नेफ्रोलॉजिस्ट) पदवी प्राप्त केलेला असावा. ii) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा iii) उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. iv) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर या ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर व ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससी आयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. v) उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पद क्र.3 : i) उमेदवार मेडिसीन एम.डी. (पॅथॉलॉजी / ट्रान्सप-युजन मेडिसीन) मध्ये पदव्युत्तर पदवीधारक असावा अथवा ii) पॅथालॉजी वा ट्रान्सफ्युजन मेडीसीनमधील पदवीकेसह मेडिसीन पदविकैसह मेडिसीनमधील पदवी (एमबीबीएस) तसेच रक्त गट सेरॉलॉजी, रक्त गट मेथडॉलॉजी आणि रक्त पुरवठ्यातील वैद्यकिय, तत्त्वे आणि / अथवा त्यासंबंधातील घटक तयार करण्यासबंधांतील पुरेसे ज्ञान असावे. अथवा
iii) नियमित सेवाकाळात एक वर्षासाठी रक्तपेढीतील अनुभवासह मेडिसीनमधील पदवी (एमबीबीएस) आणि त्याबरोबर, रक्तगट सेरॉलॉजी, रक्तगट मेथडॉलॉजी आणि पुरवठ्यातील वैद्यकिय तत्त्वे आणि / अथवा त्यासाठीचे घटक तयार करण्यासंबंधातील पुरेसे ज्ञान व अनुभव असावा. (पदवी अथवा पदविका केंद्रसरकारद्वारा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील असावी.) iv) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
v) उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. vi) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधील सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. - पद क्र.4 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची डीएम/डीएनबी (मेडीकल ऑन्कोलॉजी) पदवी प्राप्त केलेला असावा.
ii) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
iii) उमेदवारा कडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) नोंदणीकृत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. iv) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने/तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित MS-CIT जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. - पद क्र.5 : i) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा फिजीक्स या विभागातील एम.एस.सी ही पदव्युत्तर पदवीधारक आणि रेडीओलॉजिकल फिजीक्स (Diploma in Radiological Physicis) पदवीधारक असावा.
किंवा उमेदवार मेडीकल फिजीक्स मधील पदव्युत्तर पदवीधारक (M.Sc in Medical Physics) असावा किंवा परमाणु ऊर्जा नियामक मंडळाची (एईआरबी) मुलभूत पात्रता म्हणून पदव्युत्तर पदवी/डीप्लोमा मान्यताप्राप्त इतर कोणतीही धारक असावा. ii) किमान अनुभव-उमेदवारास a) कर्करोग चिकित्सा रुग्णालयात किमान तीन वर्ष भौतिकशास्त्रज्ञ वैद्यकिय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव असावा. b) भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) मान्यताप्राप्त वैद्यकिय महाविद्यालयातील भौतिकशास्त्रज्ञ भौतिकशास्त्रज्ञ वैद्यकिय भौतिकशास्त्रज्ञ म्हणून किमान तीन वर्ष काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. iii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रीका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
iv) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. - पद क्र.6 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc (OT) (बी.एस.सी (व्यवसायोपचार) / B.O.Th. (बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी) पदवीधारक असावा. ii) उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथे नाळेदणीकृत असावा. iii) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. iv) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने/तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पद क्र.7 : i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.
ii) शासन मान्यताप्राप्त यांचे मार्फत किमान ६ महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम केलेला असावा. iii) उमेदवाराकडे शासनमान्य संस्थेचे दूरध्वनीचालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावे. iv) उमेदवाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा किमान लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे. v) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांची असलेला मराठी व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. - पद क्र.8 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य/विज्ञान/कला/विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. ii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवारान शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
- पद क्र.9 : i) उमेदवार 12 नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष-किरण विषयातील बी.पी.एम.टी. (Bachelor in Praramedical Technology in Radiology) हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 6 महिन्यांची इंटरशीप पुर्ण केलेली असावी. किंवा ii) उमेदवार 12 वी (विज्ञान) / 12 वी (MCVC) आणि रेडीओग्राफी डिप्लोमा उत्तीर्ण असावा. iii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iv) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.10 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा रसायनशास्त्र सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiolgoy)/(Chemistry)/जीवरसायनशास्त्र (Biochemistry) जैविकतंत्रज्ञ (Biotechnology) या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी (Degree in B.Sc) उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- पद क्र.11 : i) उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा कार्डिओ-टेक्नोलॉजी (Cardio-Technology) विषयातील बी.पी.एम.टी. (Bachelor in Paramedical in Cardio-Technology)3 1/2 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान (B.Sc in Physics) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. व त्यांस व्ही.सी / E.C.G. मधील कामाचा 6 महिन्याचा अनुभव असावा.
ii) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 50% गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
iii) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणक मधील सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब’ स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. - पद क्र.12 : i) उमेदवाराकडे सीजीसी मान्यताप्राप्तः विद्यापिठातून कौन्सिलिंग सायकोलॉजिस्टमध्ये M.A./M.Phil ही किमान पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यांना किमान एक वर्षांचा अनुभव असलेले आरसीआय नोंदणी असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
iii) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘व स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. - पद क्र.13 : i) उमेदवार आरसीआय मान्यमाप्राप्त कोणत्याही संस्थेतून प्रोस्थेटिक्समध्ये बॅचलर (बी.पी.) पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा. ii)उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुर्णाचा इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवाराने डीओईएसीसी सोसायटीद्वारे घेण्यात येणारी संगणकामधीन सीसीसी परीक्षा ‘ओ’ स्तर वा ‘ए’ स्तर वा ‘ब स्तर वा ‘क’ स्तरात उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्याने / तिने महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण, मुंबईद्वारा संचालित एमएससीआयटी / जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ग्रामपंचायत विभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | 933/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 16,000/- रुपये ते 90,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | मुलाखत |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs InMumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑक्टोंबर 2025
BMC BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीता असलेल्या पदासाठी विहीत अर्हता /अटीची पुर्तता करीत असून सदर कंत्राटी पदाकरिता ते पात्र आहेत. उमेदवाराच्या अर्जात नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने जाहिरातीत नमूद अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज अवैध ठरविण्यात येईल.
- सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यावी तयार करुन, निवड यादी तयार करण्यात येईल. सदर निवड यादी बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येईल, दुरध्वनी /ई-मेल द्वारे कळविण्यात येणार नाही.
- अर्जाचे शुल्क : रुपये 790/- 18% जीएसटी रु.143/- एकूण रु.933/ सदर शुल्क हे ना परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
- कंत्राटी तत्वावर करण्यात आलेली नेमणूक ही निवळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. कंत्राटी तत्यावर करण्यात आलेली नेमणूक आवश्यक नसल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल.
- सदर नेमणूक नियमित स्वरुपाची नसल्यामुळे काही अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्यास कुटलेही कारण न देता निवड यादी रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे असतील.
- अर्जदाराने अर्ज स्वहस्ताक्षरात भरावा, अपूर्ण अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- पत्रव्यवहारकरिता उमेदवाराने आपला घरचा पत्ता पिन कोडसहीत अर्जात पूर्ण भरावा तसेच संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी नमूद करावेत.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे ठोक मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही.
- उमेदवाराचे विवाह झाले असल्यास विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात.
- कंत्राटी सेवेच्या कालावधीमध्ये दर 180 दिवसापूर्वी एक दिवसाचा सेवा खंड देण्यात येईल.
- कंत्राटी कालावधीत त्यांचे काम समाधानकारक न आढळल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता समाप्त करण्याचे अधिकार मा. अधिष्ठाता (नायर) यांच्याकडे राहील
- नियुक्तीचे वेळी उमेदवाराकडून रु.500/- बॉड पेपर वर करारनामा करुन घेण्यात येईल.
- सदर कंत्राटी तत्यावरील पदधारकाच्या नियुक्ती कालावधीमध्ये निवडप्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
- जे उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर खात्यामध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असल्यास त्यांनी संबंधित विभाग /खातेप्रमुख यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- अर्जाचे विहित मुल्य भरुन त्याची पावती जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- निवड झालेल्या उमेदवारास पोलिस ठाण्याचे चारित्र्य पडताळणी बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहिल.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.