BMC License Inspector Bharti 2024 : पदवीधारकांना “या” पदांसाठी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी ! त्वरीत आवेदन करा ! Apply Now

BMC License Inspector Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत “अनुज्ञापन निरीक्षक “(License Inspector) या पदांसाठी एकूण ११८ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारीतील सर्व खात्यातील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या लिपिक किवा तत्सम संवर्गातील तसेच कनिष्ट लेख परीक्षक व लेखा सहायक पदांवरील कर्मचाऱ्याकडून पदांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक व समांतर आरक्षण बदलण्याचे अधिकार किवा भरती प्रक्रिया पूर्णतः रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना राहील याबबत कोणताही वाद उपस्थित करता येणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली सविस्तर दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा १७ मे 2024 असून लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.

BMC License Inspector Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : ११८ जागा

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : विभागीय महानगरपालिका

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अनुज्ञापन निरीक्षक118

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अनुभव : अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा सहायक व तत्सम पदावर किमान 05 वर्ष नियमित तत्वावर सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा. अनुज्ञापण खात्याकडून अनुज्ञापन निरीक्षक  या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या खात्याअंतर्गत परीक्षेत उमेदवाराने एकूण १०० गुणांपैकी किमान 45 गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

वयोमर्यादा : अनुज्ञापन निरीक्षक  या पदांकरिता दिनांक 31/12/2023 रोजी पर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्ष पेक्षा अधिक नसावे.

निवडीचे निकष : अनुज्ञापन निरीक्षक पदांकरिता घेण्यात येणारी परीक्षा हि भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. अनुज्ञापण निरीक्षक पदांची अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांचे सदर पदांकरिता घेण्यात येणारी बहुपर्यायी वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. उमेदवाराने पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार निवड निकष लावण्यात येणार आहे. 

परीक्षा शुल्क :

  • खुला प्रवर्गाकरिता 1000/- रुपये
  • मागासवर्गीय करिता 900/- रुपये

(सूचना – परीक्षा शुल्क भरण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थिती मध्ये परत केले जाणार नाही.)

मासिक वेतन : 29,200/- रुपये ते 92,300/-रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई

परीक्षा केंद्र विषयी नियमावली : 

  • संबधित प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षेसाठी प्रवेश पत्रामध्ये देण्यात आलेले परीक्षा केंद्र/ स्थळ/तारीख/सत्र यामध्ये बदल करण्याबाबतची विनंती मान्य करता येणार नाही.
  • तथापि कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय व्यवहारकरिता कोणतेही परीक्षा केंद्र/स्थळ/तारीख/सत्र यामध्ये बदल करण्याची जबाबदारी परीक्षा आयोजक संस्थेची राहील.
  • उमेदवार स्वताचा जोखमीवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतील.कोणत्याही स्वरूपातील इजा किवा नुकसानीसाठी परीक्षा आयोजक संस्था जबाबदार राहणार नाही. परीक्षेसाठी प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या वेळेनंतर परीक्षा केंद्रावर उपस्थित होणाऱ्या उमेदवारास परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही. प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेली रिपोर्टिंग वेळ हि परीक्षा सुरु होण्यापूर्वी आहे. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा असला तरी उमेदवारांना विविध प्राथमिक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी जसे कि विविध कागदपत्राची पडताळणी बायोमात्रिक इत्यादी बाबींच्या पुर्तेतेसाठी परीक्षा कालावधीच्या सुमारे 1 तास आधी परीक्षा स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 मे 2024

BMC License Inspector Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :

  1. सदर खात्यांतर्गत भरती प्रक्रियेत अंतिम निर्णय घेण्याचे व प्रशासकीय किवा अन्य कारणास्तव सदर खात्यअंतर्गत भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार मा.महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना राहतील.
  2. सदर खात्याअंतर्गत भरती प्रक्रियेत नमूद रिक्त पडे उपलब्धतेबाबत आणि आवश्यकतेनुसार भरण्यात येतील. तथापि तयार करण्यात आलेली निवड यादी कोणत्याही वेळेस पूर्व सूचना न देता रद्द करण्याचे अथवा यादीचा कालावधी वाढविण्याचे अधिकार बृहमुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आहे.
  3. इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदांकरीत विचार केला जाणार नाही.
  4. उमेदवाराचा ईमेल आयडि आणि भ्रमणध्वनि क्रमांक सु स्पष्ट व पूर्ण असावा.
  5. उमेदवाराणे नमूद शैक्षणिक प्रमाणपत्रे यांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती संबधित कार्यालयातील समक्ष अधिकाऱ्यांकडून साक्षकीत करून घेऊन तपसणीसाठी नियुक्तिपूर्वी सदर करणे आवश्यक आहे.
  6. निवडीच्या निकषनुसार पुरेषे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवडीचे निकष शिथिल करण्याचे आधिकार महानगरपालिका आयुक्त यांना राहतील.
  7. उमेदवारांची अनुज्ञापण  निरीक्षक पदांवरील नेमणूक प्रारंभी तींन वर्षाच्या परिवीक्षाधीन कालावधीकरीता असेल या कालावधीत त्यांची वर्तवणूक उपस्थिती व सेवा असमाधान कारक आढल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना त्यांच्या मूळ पदांवर प्रत्यवर्त करण्यात येईल.
  8. ज्या कर्मचाऱ्यानी यापूर्वी आरक्षणाचा लाभ घेतला आहे अशा कर्मचाऱ्यानी जात वैधता प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे. अन्यथा नियुक्तीचा विचार केला जाणार नाही.
  9. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना : 

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील.इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ऑनलाईन पद्धतीने करावयचा अर्ज https://portal.mcgm.gov.in या पोर्टलवर उज्वल संधीकारिता सर्व नोकरीच्या संधी या टब मध्ये उपलब्ध असेल. उमेदवाराने वर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन परीपात्राकासोबत जोडलेल्या HOW TO APPLY मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपने पालन करून अर्ज सादर करावा.


हे आपल्या मित्रांना पाठवा.