District Court Recruitment 2024 : जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या आस्थापनेवर “सफाईगार” या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 4 थी उत्तीर्ण उमेदवारांना जिल्हा न्यायालय मध्ये सरकारी नोकरी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठविण्याचे आवाहन केले आहे. सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा न्यायालय बुलढाणा यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 असून त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही. कृपया उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
District Court Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : जिल्हा न्यायालय बुलढाणा
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन
एकूण पदसंख्या : 01
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सफाईगार | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा.
- शरीर प्रकृतीने सुदृढ असावा.
- पदांचे समारूप काम करण्याची योग्यता असावी.
- उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा आणि साधारण प्रवर्गाकरिता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. मागासवर्गीय असल्यास 43 वर्षापेक्षा जास्त नसावा.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 15,000/- रुपये ते 47,600/-रुपये
नोकरीचे ठिकाण : बुलढाणा
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बुलढाणा – 443001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2024
District Court Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांना महत्वाच्या सूचना :
- जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करावा. उमेदवारांनी आपले अर्ज आपआपल्या विभाग/ कार्यालय प्रमुखांमार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.
- उमेदवाराने त्याचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्जावर दिलेल्या जागी लाऊन त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी कि त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुद्धा येईल.
- उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा आणि शैक्षणिक प्रमापात्राची जातीचा दाखला साक्षांकित प्रत, सफाई कामाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र व इतर विशेष अहर्ता असल्यास त्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने स्वताचा पत्ता लिहिलेले एक पोस्टाचे पाकीट अथवा १० रु.चे पोस्टाचे तिकीट लावलेला व स्वताचा पत्ता लिहिलेला लिफाफा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- विहित तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र उमेदवारांना पुढील चाचण्यासाठी बोलवायच्या उमेदवारांनी यादी अंतिम दिनांकाच्या 15 दिवसानंतर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट वर सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. त्यासोबत पुढील चाचणी बद्दलेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.
- उमेदवारांना चाचण्या व मुलाखतीस बोलविल्यास स्वताच्या खर्चाने हजर राहावे लागेल.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !