IBPS RRB Bharti 2025 : IBPS RRB परीक्षा ही ग्रामीण भागातील बँकांमध्ये (Regional Rural Banks – RRBs) लिपिक (Office Assistant) आणि अधिकारी पदांसाठी (Officer Scale I, II, III) उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोजित केली आहे. सदर परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असते आणि त्यात प्रिलिम्स (Preliminary) आणि मेन्स (Mains) परीक्षा अशा दोन परीक्षा आहेत. या भरती मध्ये तब्बल 13,217 जागांची भरती होणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IBPS RRB Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 013,217 रिक्त जागा
भरती विभाग : IBPS RRB
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7,972 |
| 02 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 3,907 |
| 03 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 854 |
| 04 | ऑफिसर स्केल-II (IT) | 087 |
| 05 | ऑफिसर स्केल-II (CA) | 069 |
| 06 | ऑफिसर स्केल-II (Law) | 048 |
| 07 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 016 |
| 08 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 015 |
| 09 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 050 |
| 10 | ऑफिसर स्केल-III | 199 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह पदवी (Electronics/ Communication/Computer Science/Information Technology) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5 : i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6 : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह विधी पदवी (LLB) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) CA/MBA (Finance) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8 : i) MBA (Marketing) ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9 : i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. ii) 05 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28,30,32,40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- पद क्र.01 : General/OBC : 850/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : 175/-रुपये)
- पद क्र.02 ते 10 : General/OBC : 850/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : 175/-रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-रुपये ते 63,840/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2025
IBPS RRB Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज | पद क्र.01 : येथे क्लिक करा |
| पद क्र.2&10 : येथे क्लिक करा | |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
