Jilha Parishad Wardha Bharti 2025 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजना,शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील असलेली डाटा एन्ट्री ऑपरेटर पदे हि भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि जिल्हा परिषद वर्धा यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी पास उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे, उमेदवारांना 03 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम संधी आहे.अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
Jilha Parishad Wardha Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा परिषद वर्धा (Jilha Parishad Wardha)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 07 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.
व्यावसायिक पात्रता : i) किमान इयत्ता १२ वी पास ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. iii) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. iv) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही जिल्हा परिषद वर्धा यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सदर पदांसाठी उमेदवारांची किमान वय 18 वर्ष व कमाल वय हे 43 वर्ष असणे बंधनकारक आहे.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | 500/- रुपये |
उमेदवारांनी अर्जासोबत परीक्षा शुल्क म्हणून रक्कम 500/- रुपये चा धनाकर्ष (Demand Draft) Mid Day Meal Scheme, Education Officer (Primary) ZP Wardha यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचेच धनाकर्ष अर्जासोबत जोडा.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : i) डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इयत्ता 12वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील. ii) सदर उमेदवारांची मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि संगणक ज्ञानाची परीक्षा घेण्यात येईल, यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील, प्रत्याक्षित परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त करणारे उमेदवार डाटा एन्ट्री ऑपरेटर च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील. iii) सदर पदांसाठी मुलाखत घेण्यात येणार नाही.
नोकरी चे ठिकाण : वर्धा (Jobs In Wardha)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद वर्धा कार्यालय शिक्षण विभाग (प्राथमिक) 1 ला माळा, दालन क्रमांक 105 प्रशासकीय इमारत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक सिव्हील लाईन वर्धा – 442001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोंबर 2025 रोजी संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत
Jilha Parishad Wardha Bharti 2025 links
जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. सदर अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरिता अर्ज असे नमूद करावे, उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद वर्धा यांच्या कार्यालयातील प्रधान मंत्री पोषण आहार कक्ष मध्ये समक्ष किवा अंतिम दिनांकाच्या पूर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता,व्यावसायिक पात्रता वय प्रमाणपत्र प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपत्राचा झेरोक्स प्रती स्व स्वक्षांकित करून जोडाव्यात.
- निवड झालेल्या उमेदवारांना प्रवर्ग निहाय 06 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- वेळापत्रकात फेरबदल करणे पदसंखेत बदल करणे कोणत्याही टप्यावर निवड प्रक्रिया थांबविणे किवा रद्द करणे याबाबतचा अधिकार शासन/अध्यक्ष जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा याना राहील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकषांची पूर्तता करत नाही आणि/किंवा त्याने कोणतीही चुकीची/खोटी माहिती/प्रमाणपत्र/कागदपत्रे सादर केली आहेत किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे, तर त्याची/तिची उमेदवारी रद्द केली जाईल.
कोणत्याही स्वरूपात प्रचार केल्याने उमेदवारी अपात्र ठरेल आणि या प्रकरणात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. - निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने चुकीची माहिती दिल्याचे आणि/किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाईल आणि भविष्यात त्याला जिल्हा परिषद वर्धा भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हे पण वाचा : District Court Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद भरती 2025 | येथे आजचं अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.