जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांच्या शासन निर्णय अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे (Jilhadhikari Karyalay)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 विधी अधिकारी01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी). ii) जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. iii) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. iv) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र वनविभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 45,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी गुणांकन पद्धतीनुसार 
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : धुळे (Jobs in Dhule)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोंबर 2025 

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • संबधित नियुक्ती प्राधिकारी शासनाच्या वतीने नियुक्तीच्यावेळी संबधितांबरोबर विहीत प्रपत्रात करार करतील. कराराचे विहीत प्रपत्र परिशिष्ट व मध्ये देण्यात आले आहे. कराराची सर्व कागदपत्रे जतन करुन ठेवणे ही संबंधीत कार्यालयाची जबाबदारी असेल.
  • करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चा व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.
  • शासन निर्णय दि. 30 जुलै, 2011 व त्यासोबतचे परिशिष्ट अ मधील, तसेच परिशिष्ट व मधील संभाव्य करारनाम्यातील, तसेच शासन वेळोवेळी सुधारीत करेल अश्या अटी व शर्ती लागू राहतील.
  • प्राप्त होणाऱ्या अर्जाची छानणी करुन जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व बार कॉन्सील कार्यालय (मा. जिल्हा न्यायालय) येथील नोटीस बोर्डावर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी वेळोवेळी प्रसिध्ट करण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo