Maharashtra Homeguard Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश असून या संघटनेत अनेक रिक्त पदे रिक्त आहेत.सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा होमगार्ड यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Maharashtra Homeguard Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 9700 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड संघटना
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | होमगार्ड | 9700 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही विद्याशाखेतून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत पाहिजे.
शारीरिक पात्रता :
- उंची : पुरुषांकरिता 162 से.मी. महिलांकरिता 150 से.मी.
- छाती : न फुगविता 76 से.मी कमीत कमी 5 से.मी फुगवून आवश्यक (फक्त पुरुषांकरिता)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : 800/- रुपये प्रती दिन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)
शारीरिक क्षमता चाचणी : उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या पुढील चाचण्या घेण्यात येणार नाहीत.
आवश्यक कागदपत्रे : रहिवासी पुरावा-आधार कार्ड-मतदान कार्ड , शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व इतर
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024
Maharashtra Homeguard Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- होमगार्ड नोंदणीचे अर्ज हे वरील लिंक द्वारे फक्त इंग्रजी भाषे मधूनच भरायचे आहेत.
- उमेदवार ज्या भागाचा रहिवासी आहे,त्या भागातील लोकल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे यांच्या कडून चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादार करावायचे आहे.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्याची प्रिंट जपून ठेवायची आहे.
- भरती विषयी अधिक माहिती हि खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय डाक विभागात तब्बल 44,228 जागांसाठी मेगा भरती l दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! ऑनलाईन अर्ज येथे करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !