Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2025 साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये तब्बल 15,631 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Police Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : तब्बल 15,631 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2025 (Maharashtra Police Bharti 2025)
भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या | 
| 01 | पोलीस शिपाई (Police Constable) | 12624 | 
| 02 | पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) | 0515 | 
| 03 | पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) | 1566 | 
| 04 | पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) | 0113 | 
| 05 | कारागृह शिपाई (Prison Constable) | 0554 | 
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1,2,3,5 : इच्छुक उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 12वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.4 : इच्छुक उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 1०वी उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती च्या पोर्टल वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
शारीरिक पात्रता :
| उंची / छाती | पुरुष | महिला | 
| उंची | 165 सेमी पेक्षा कमी नसावी | 155 सेमी पेक्षा कमी नसावी | 
| छाती | न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी | – | 
मैदानी परीक्षा :
| पुरुष | महिला | गुण (मार्क) | |
| धावणी (मोठी) | 1600 मीटर | 800 मीटर | 20 गुण | 
| धावणी (मोठी) | 100 मीटर | 100 मीटर | 15 गुण | 
| गोळा फेक | – | – | 15 गुण | 
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25/28 वर्षापर्यंत असावे. (मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क | 
| खुला प्रवर | 450/- रुपये | 
| मागासवर्गीय प्रवर्ग | 350/- रुपये | 
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल. (Police Bharti 2025)
निवड प्रक्रिया :
- शारीरिक चाचणी (Physical Test) : यात उमेदवाराची शारीरिक क्षमता तपासली जाते.
- लेखी परीक्षा (Written Test) : मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. (लेखी परीक्षेमध्ये अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण याचा समावेश राहील.)
- कागदपत्र तपासणी (Document Verification) : निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:59)
ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा शेवटचा दिनांक : 03 डिसेंबर 2025 (रात्री 11:59)
Maharashtra Police Bharti 2025 links
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा | 
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा | 
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा | 
आवश्यक कागदपत्रे :
- SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र
- जात-वैधता प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ( MSC-CIT )
- नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र
- NCC प्रमाणपत्र इत्यादी
(उपरोक्त नमूद कागदपत्रे हि शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील. ) (Police Bharti 2025)
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- पोलीस भरती 2025 हि महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/बॅन्डस्मन/राज्य राखीव पोलीस बलातील शसस्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 31/12/2025 अखेरपर्यंत झालेल्या पदांची गणना करून जाहिरात करण्यात आलेली आहे.
- पोलीस भरती 2025 च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल, निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीच्या हक्क प्राप्त झाला असे समजविण्यात येऊ नये.
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक : माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश आवश्यक राहील. (Police Bharti 2025)
- शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार सबंधित प्रवार्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यास पात्र असतील.
- उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे, लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
महत्वाची टीप :
- उमेदवाराकडे आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल असने आवश्यक आहे, नसल्यास प्रथम त्यांनी त्यांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकवर लिंक करून घेण्यात आल्यानंतरच आवेदन अर्ज सादर करावा, याबाबतचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवारांचे स्वताचे नाव,शिक्का,जात प्रवर्ग,निर्गमित दिनांक, सक्षम प्रधीकार्यांची स्वाक्षरी इत्यादी बरोबर असल्याची खात्री उमेदवाराने स्वत करावी.
- उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो,एका पदांसाठी एकापेक्षा जात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील.
- उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
- पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतही शारीरिक इजा/नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वत जबाबदार राहील, त्याकरिता उमेदवाराने स्वताची शारीरिक क्षमता विचार घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे.
- भरती प्रक्रीयेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील व तो उमेदवारांना बंधनकारक राहील.
- आवश्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किवा त्यापूर्वीच्या दिनांकाची असावीत व सदरची मूळ प्रमाणपत्रे कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे, सदर मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
- भरती प्रक्रियेत मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत पोलीस घटक प्रमुखाकडून ज्या ज्या वेळी मागणी करण्यात येईल त्या त्या वेळी कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. (Police Bharti 2025)
विशेष सूचना :
- ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल तसेच उमेदवाराने मागितलेले सामाजिक समांतर आरक्षण अथवा वयोमर्यादा शिथिल करणे इत्यादी मधील बदल सवलती नामंजूर करण्यात येतील.
- लेखी परीक्षेदरम्यान परीक्षा कक्षात किवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणणे व वापरण्यास सक्त मनाई आहे.
- कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्र मध्ये त्रुटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराला त्याचवेळी पुढील प्रकीयेसाठी अपात्र केले जाईल याची नोंद घ्यावी.
- जाहिराती मध्ये नमूद केलेले सर्व शासन निर्णय/अधिसूचना/शासन परीपत्रके हि महाराष्ट्र शासनाच्या www.policerecruitment2025.mahait.org व www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. (Police Bharti 2025)
हे पण वाचा : भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Indian Army Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
 
 

