Mahavitaran Nagpur Recruitment 2024 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध पद्धतीवर नोकरीसाठी संधी उपलब्ध झाली आहे, या भरती मध्ये विभागनिहाय अस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली लेखात दिली आहे, तसेच पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण जाहिरात pdf व ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक खाली लेखात दिली आहे,कृपया अर्ज करताना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Mahavitaran Nagpur Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : महावितरण नागपूर ग्रामीण मंडळ (NCVT)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कोपा | 34 |
02 | वीजतंत्री | 109 |
03 | तारतंत्री | 89 |
(टीप – उमेदवारांनी पदांचा तपशील जाहिरात मध्ये विभागानुसार दिला आहे,कृपया मूळ जाहिरात पहावी.)
शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : दिनांक 31 मे 2024 पर्यंत 18 वर्ष ते 32 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिल राहील.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतनश्रेणी : शासनाच्या नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
शैक्षणिक कागदपत्रे : एस.एस.सी व आय टी आय वीजतंत्री/तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थाचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्राची मूळप्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जून 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2024
Mahavitaran Nagpur Recruitment 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (नोंदणी) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील शैक्षणिक अहर्ता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
- नमूद पद संख्या कमी जास्त करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
- भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने राजकीय किवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- शिकाऊ उमेदवारांची निवड हि एस.एस.सी. व आय टी आय गुणांच्या टक्केवारीनुसार अनुक्रमे अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाहिल.
- शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीकरिता 1:10 व अनुसूचित जमातीकरिता 1:11 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील.
- उमेदवारांनी संकेतस्थळ ऑनलाईन नोंदणी केल्याची प्रत व शैक्षणिक अहर्ता धारण गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिलेल्या वेळेस संबधित कार्यालयास कामकाजाचे दिवड सादर करावे व जे उमेदवार आपले संपूर्ण दस्तऐवज सादर करणार नाहीत त्या उमेदवाराची प्रशिक्षण करिता निवड करण्याबाबत विचार करता येणार नाही.
हे आपल्या मित्रांना पाठवा !