MMRDA Bharti 2026 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0235 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार सून भारती विषयक अधिक माहिती खालील लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MMRDA Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0235 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) | 07 |
| 02 | सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ) | 01 |
| 03 | सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार) | 01 |
| 04 | उपनियोजक | 29 |
| 05 | सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक | 04 |
| 06 | सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 82 |
| 07 | सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ) | 04 |
| ०8 | सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 16 |
| 09 | सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) | 02 |
| 10 | सहाय्यक समाज विकास अधिकारी | 07 |
| 11 | सहाय्यक विधी अधिकारी | 04 |
| 12 | उद्यान विद्या सहाय्यक | 02 |
| १३ | उप लेखपाल | 33 |
| 14 | लघुटंकलेखक | 10 |
| 15 | भूमापक | 31 |
| 16 | संगणक तंत्रज्ञ | 02 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : i) वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील किंवा समतुल्य पदवी ii) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.5 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8 : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9 : i) इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी/डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : i) समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW)
- पद क्र.11 : i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.12 : i) वनस्पती शास्त्र, कृषी शास्त्र, उद्यान विद्या शास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष पदवी ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.13 : i) 60% गुणांसह B.Com (मागासवर्गीय:55% गुण) ii) MS-CIT iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.14 : i) 10वी उत्तीर्ण ii) शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.15 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (सर्वेक्षक) iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : i) 10वी उत्तीर्ण ii) संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा दोन वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. iii) 07 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/अनाथ/आदुघ : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 1000 रुपये |
| अनाथ/मागासवर्गीय | 900/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 मार्च 2026
MMRDA Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

