Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका शहर बस सेवेकरिता कार्यरत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) करिता विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही नाशिक महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार असून भरती ची संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक)
भरती श्रेणी : नाशिक महानगरपालिका अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | जनरल मॅनेजर (ॲडमिन आणि टेक्निकल) | 01 |
02 | डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन) | 01 |
03 | डेप्युटी जनरल मॅनेजर (ॲडमिन आणि टेक्निकल) | 01 |
शैक्षणिक पात्रता : B.E/B.E (Mech)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/-रुपये ते 75,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)
मुलाखतीचा पत्ता : सिटीलिंक भवन, वीर सावरकर तरण तलाव समोर, नाशिक- 422002.
मुलाखतीचा दिनांक : 28 फेब्रुवारी 2025
ईमेल आयडी : gmadmin_citilinc@nmc.gov.in
Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र सर्व आवश्यक कागदपत्रासह साक्षांकित प्रती,पासपोर्ट साईज फोटो,मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून वरील दिलेल्या ईमेल आयडीवर मुलाखतीच्या आदल्या दिवशी 5.00 वाजेपर्यंत पाठवावेत, तसेच वरील पत्यावर तारखेच वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील पदांसाठी थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे,
- वरील पद आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करणेचा अधिकार अध्यक्ष कार्यकारी यांनी राघून ठेवला आहे.
- भरती प्रक्रिया तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !