NUHM BHARTI 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत 030 पदांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

NUHM BHARTI 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरावयाचे असून या भरती एकूण 030 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NUHM BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 030 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)

भरती श्रेणी : आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ10
02वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ
03स्टाफ नर्स (स्री)06
04स्टाफ नर्स (पुरुष)01
05ए एन एम 10
06औषध निर्माता03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण ii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक iii) शासकीय/ स्थानिक संस्था/ खाजगी यांचा संबधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
  • पद क्र.2 : i) मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस पदवी उत्तीर्ण ii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक iii) शासकीय/ स्थानिक संस्था/ खाजगी यांचा संबधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
  • पद क्र.3 : i) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किवा BSC नर्सिंग कोर्स उत्तीर्ण ii) महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
  • पद क्र.4 : i) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किवा BSC नर्सिंग कोर्स उत्तीर्ण ii) महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधन कारक
  • पद क्र.5 : i) 10 वी उत्तीर्ण आणि ए एन एम कोर्स उत्तीर्ण  ii) महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
  • पद क्र.6 : i) 12 वी + डी. फार्म किवा बी. फार्म पदवीधर ii) महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत कमाल  राखीव प्रवार्साठी 38 वर्ष ते राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा राहील. (वैद्यकीय अधिकारी यांना 70 वर्ष राहील.)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : i) वैद्यकीय अधिकारी पदांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. ii) स्टाफ नर्स, ए एन एम व औषधनिर्माता पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (Jobs in New Mumbai)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,3रा मजला, नमुमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1 से.15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2025

NUHM BHARTI 2025 LINKS

संपूर्ण जाहिरात pdfयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील जाहिरात pdf मध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • सदर पदभरती प्रक्रीयेबाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेले पदांचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  • विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाफा वर विषय – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्ज सादर करणेबाबत असा उल्लेख करावा.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 0174 जागांची भरती सुरु ! Nagpur Mahanagar Palika Bharti 2025


⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo