PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (PCMC) यांच्या आस्थापनेवर अग्निशमन या विभागात “फायरमन रेस्क्यूअर” या पदांसाठी गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणा निहाय पदसंख्या, शैक्षणिक पात्रता व इतर अटींची पूर्तता खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, सदर बाबींची पूर्तता करण्याऱ्या उमेद्वारांकाना पिंपरी चिंचवड महानगर पालिके मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी खाली सविस्तर जाहिरात PDF उपलब्ध करून दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 17 मे 2024 आहे.
PCMC Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाइन
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगर पालिका (PCMC)
भरती श्रेणी : महानगरपालिका विभागीय
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | फायरमन रेस्क्यूअर | 150 |
शैक्षणिक पात्रता :
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई याचा 6 महिने कालावधी अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
- एमएस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता :
बाब | पुरुष | महिला |
उंची | १६५ सेमी | १६२ सेमी |
वजन | ५० किलोग्रॅम | ५० किलोग्रॅम |
छाती | न फुगवता ८१ सेमी फुगवून ८६ सेमी | महिला उमेदवारांसाठी आवश्यक लागू नाही. |
दृष्टी | सामान्य | सामान्य |
ठेवण | उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा. | उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा. |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 1000/- रुपये मागासवर्गीय – 900/- रुपये
मासिक वेतन : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 मे 2024
PCMC Recruitment 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी आणि मगच अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !