Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था मध्ये नविन नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये “समुपदेशक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ” हि पदे भरली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि करार पद्धतीवर असून एकवट मानधनावर असून निवड तोंडी मुलाखत पद्धतीने होणार आहे. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील.शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करावा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk in Interview)
भरती विभाग : पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | समुपदेशक | 11 |
02 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्तर ऑफ सोशल वर्क (MSW) पदवी उत्तीर्ण ii) एच.आय.व्ही एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
पद क्र.02 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्र शाखेची पदवी (बी.एस.सी.) व डी.एम.एल.टी.उत्तीर्ण ii) एच आय व्ही रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरमधील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
हे पण वाचा : जिल्हा परिषद आरोग्य विभागात नविन पदांसाठी भरती सुरु l पात्रता – 12वी उत्तीर्ण l येथे ऑफलाईन अर्ज करा !
मासिक वेतन श्रेणी : 22,365/- रुपये
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र,1 ला ,663 शुक्रवार पेठ, गाडीखाना पुणे – 411002
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जून 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म ही ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचे आहेत.
- या भरतीची निवड ही थेट तोंडी मुलाखतीवर होणार आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !