RRB NTPC BHARTI 2025 : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल ८८७५ रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून सदर पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण जाहिरात pdf व ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB NTPC BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : ८८७५ रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय रेल्वे (RRB NTPC BHARTI 2025)
भरती श्रेणी : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर | १६1 |
02 | स्टेशन मास्टर | 615 |
03 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3423 |
04 | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट | ९२१ |
05 | सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट | ६३8 |
06 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | २४२४ |
07 | अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट | ३९4 |
08 | ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट | १६३ |
०९ | ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | ७७ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
- पद क्र.2 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
- पद क्र.3 : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
- पद क्र.4 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- पद क्र.5 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
- पद क्र.6 : पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- पद क्र.7 : i) पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
- पद क्र.8 : i) पात्र उमेदवार हा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
- पद क्र.9 : पात्र उमेदवार हा50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे विभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्ष सुट)
(उमेदवारांनी लक्षात ठेवावे की या अर्जात भरलेली जन्मतारीख मॅट्रिक्युलेशन /एसएसएलसी/दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवलेली असावी. त्यानंतरच्या कोणत्याही ‘बदलाच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. जन्मतारीखात कोणताही फरक पडल्यास उमेदवार अपात्र ठरेल.)
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
General/OBC/EWS | 500/- रुपये |
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | 25०/- रुपये |
(वर दर्शविण्यात आलेले परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंग शुल्क (लागू असेल तर) वगळून आहे. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाईल. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम हि ना परतावा असेल.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | ऑनलाईन CBT परीक्षा |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 नोव्हेंबर 2025
RRB NTPC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- आधार नसलेल्या अर्जांसाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशीलवार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना आधार वापरून त्यांचे प्राथमिक तपशील पडताळून पाहावेत असा सल्ला देण्यात येत आहे.
- आधार वापरून यशस्वी पडताळणी करण्यासाठी, आधारमधील नाव आणि जन्मतारीख दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रात उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी १००% जुळवून अपडेट करावी.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो आणि नवीनतम बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस) सह अपडेट करणे आवश्यक आहे.
- ही सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपाची आहे. संपूर्ण तपशीलांसाठी, अर्जदारांना ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार CEN क्रमांक ०४/२०२५ (विभाग नियंत्रक) पूर्णपणे वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- तपशील आणि वरील भरतीशी संबंधित कोणतीही शुद्धिपत्रक/परिशिष्ट/महत्वाची सूचना खाली सूचीबद्ध केलेल्या RRB च्या वेबसाइटवर वेळोवेळी जारी केली जाईल.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.