Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 0219 पदे भरण्यात येणार असून इच्छुक व शैक्षणिक अहर्ता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात हि समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे (Samaj Kalyan Vibhag) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0219 रिक्त जागा
भरती विभाग : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
02 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
03 | गृहपाल / अधिक्षक | 153 |
04 | उच्च श्रेणी लघुलेखक | 10 |
05 | निम्न श्रेणी लघुलेखक | 03 |
06 | लघुलेखक | 09 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.02 : i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.03 : i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.04 : i) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.05 : i) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ii) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य) iii) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा iv) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट v) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.06 : i) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ii) लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/- रुपये ,मागास प्रवर्ग : 900/-रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 1,42,400/- मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (TCS)
नोकरीचे ठिकाण : पुणे महाराष्ट्र (jobs in Pune)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 नोव्हेबर 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !