महाराष्ट्र शासन : सरळसेवा भरती अंतर्गत तब्बल 490 जागांची भरती सुरू ! Saralseva Bharti 2025

Saralseva Bharti 2025 : महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0490 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Saralseva Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0490 रिक्त जागा

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Mahanagarpalika)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 फिजिओथेरपिस्ट 002
02 औषधनिर्माता 014
03 कुष्टरोग तज्ञ002 
04 स्टाफ  नर्स 078 
05 क्ष – किरण तंत्रज्ञ006 
06 हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रशी टेक्निशियन001 
07 मानस उपचार समूपदेशक 002 
08 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 001 
09 लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षक 006 
10 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)058 
11 कनिष्ठ अभियंता (विद्युत)012 
12 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)008 
13 चालक यंत्रचालक 012 
14 अग्निशामक (फायरमन )138 
15 कनिष्ठ विधी अधिकारी 002 
16 क्रीडा पर्यवेक्षक 001 
17 उद्यान अधीक्षक 002 
18 उद्यान निरीक्षक 011 
19 लिपिक टंकलेखक 116 
20 लेखा लिपिक016 
21 आया (महिला)002

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. पी. टी. एच तथापि पदविधारक उमेदवार न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल. ii) संबधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. फार्म पदवी ii) महाराष्ट्र फार्मसी कौशिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अकट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक iii) संबधित विषयातील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र.03 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण ii) 02 वर्षाचा परामेडीकल लेप्रसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण
  • पद क्र.04 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एस्सी नर्सिंग या विषयाची पदवी किवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफ या विषयाची पदविका
  • पद क्र.05 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्र विषयसाह विज्ञान शाखेची पदवी ii) मान्यताप्राप्त संस्थेतून रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण 
  • पद क्र.06 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ii) मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठयकर्म पूर्ण असणे आवश्यक.
  • पद क्र.07 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.ए. क्लिनिकल सायकॉलॉजि ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था रुग्णालयातील संबधित विषयातील कामकाजाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र.08 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्र/ रसायनशास्र/जीवशास्र/वनस्पतिशास्र/प्राणीशास्र या विषयासह विज्ञान पदवी ii) मान्यताप्राप्त संस्थेची डी. एम. एल. टी. उत्तीर्ण
  • पद क्र.09 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी ii) लेखा परीक्षण विषयक कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र.10 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • पद क्र.11 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • पद क्र.12 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी
  • पद क्र.13 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ii) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा 06 महीने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण iii) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
  • पद क्र.14 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ii) राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा 06 महीने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण
  • पद क्र.15 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी 
  • पद क्र.16 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) शासन मान्य बी.पी.एड. पदवी उत्तीर्ण 
  • पद क्र.17 : i) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी. एस्सी/ बॉटणी फॉरेस्ट पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्रतिल पदवी
  • पद क्र.18 : i) मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी. एस्सी बॉटनी /फॉरेस्ट पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पति शास्रतिल पदवी
  • पद क्र.19 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारक केलेले असावे.
  • पद क्र.20 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारक केलेले असावे.
  • पद क्र.21 : i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. ii) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था रुग्णालयातील किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 10 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 55 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गासाठी 1000/-रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जून 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जुलै 2025

Saralseva Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 पदांसाठी “अग्निशमक विमोचक” पदांची भरती ! Nagpur Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!