Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, कार्यालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार महाराष्ट्र सरकार मध्ये नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे, वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Vanvibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान द्वारे (Vanvibhag Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कायदा अधिकारी | 01 |
02 | निसर्ग पर्यटन व्यवस्थापक | 01 |
03 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक. ii) जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले सहसचिव/उपसचिव/अवर सचिव या दर्जाचे अधिकारी या शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावा. iii) करार पध्दतीने नियुक्ती करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारिरीक, मानसिक वा आरोग्याचे दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी.
- पद क्र.02 : i) कोणत्याही शाखेत पदवी / एमबीए / हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असल्यास प्राधान्य इंग्रजी हिन्दी व मराठी भाषा सहजतेने वाचता लिहता व बोलण्यास सक्षम असावा. ii) वनविभागात काम केलेले असल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव.
- पद क्र.03 : i) कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS-CIT परीक्षेत उत्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी-४० शप्रमी, मराठी-४० श.प्र.मी. ii) किमान 2-3 वर्षाचा अनुभव तसेच मुलभुत संगणक ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान असने आवश्यक आहे. इंटरनेट आणि ई-मेलवरही काम करता आले पाहिजे. तसेच MS-Office, MS-Word, MS-Excel व Power Point इ. चे चांगले ज्ञान असावे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र वनविभाग यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत राहील.
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | गुणांकन पद्धतीनुसार |
दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे कार्यालय पहिला माळा, नविन प्रशासकिय इमारत (वन भवन), शासकिय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल, सिव्हील लाईन, नागपूर ४४० ००१.
ई-मेल पत्ता : edpenchfoundation@mahaforest.gov.in
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोंबर 2025
Vanvibhag Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या पदाकरीता मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.
- पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) सदर पदाकरीता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे मुळ दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.
- जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमुद करावे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने आपला जातीचा तपशिल अचूकपणे नमूद करावा.
- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, सा.शै.मा.प्र. प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरुपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.