Vasai Virar Mahangarpalika Bharti 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपासाठी कंत्राटी पद्धतीने रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहेत.या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे असून निवड प्रक्रिया थेट गुणांकन (मेरीट) पद्धतीने होणार आहे. या भरती साठी इच्छुक व पात्रता उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने केवळ अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच महानगरपालिका मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच खाली अर्जाची संपूर्ण जाहिरात pdf, अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Vasai Virar Mahangarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे
भरती विभाग : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता | 03 |
02 | औषध निर्माता | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) विज्ञान शाखेतील पदवीधर किवा विज्ञान शाखेतील 12वी परीक्षा उत्तीर्ण आणि MPW/LHV/ANM/Health Worker म्हणून काम करण्याचा अनुभव ii) सरकार मान्य MS-CIT अभ्यासक्रम उत्तीर्ण iii) बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्त्याचे शासन मान्य प्रशिक्षण पूर्ण iv) स्वच्छता निरीक्षक पदाचा शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण.
- पद क्र.02 : i) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून औषध निर्माता पदवी किवा पदविका परीक्षा उत्तीर्ण ii) नामांकित रुग्णालय किवा शासनमान्य आरोग्य केंद्रात औषधसाठा व्यवस्थापन करण्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव iii) उमेदवारास MS WORD एक्सेल, सह विविध संगणक प्रोग्रामची चांगली माहिती असावी.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,600/- रुपये ते 60,000/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती
निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धत (मेरीट)
नोकरीचे ठिकाण : पालघर (jobs in Palghar)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग,महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत,प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला,विरार (पूर्व), ता.वसई जि.पालघर – 401305
अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑक्टोंबर 2024
Vasai Virar Mahangarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !