YCMOU BHARTI 2025 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत प्रतिनियुक्तीने नवीन पद भरती करण्यासाठी पात्र अधिकारी/कर्मचारी कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
YCMOU BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU Nashik)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | नियोजन अधिकारी | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.
व्यावसायिक पात्रता : i) पदव्युत्तर पदवी बी प्लस श्रेणीमध्ये उत्तीर्ण (Master’s degree in B+) ii) व्यवस्थापनातील अतिरिक्त पदवी/ पदविका (Additional degree/ Diploma in Management) iii) सरकारी/निमसरकारी/उद्योग अध्यापन क्षेत्रांत गट अ मध्ये काम करण्याचा 15 वर्षांचा अनुभव (15 years experience in teaching in Group ‘A’ in Government/ Semi Government / Industry Sectors) iv) नियोजन आणि विकास तसेच गुणवत्ता हमी क्षेत्रातील काम किंवा अभ्यासाचा पुरावे.(Evidence of work or study in the area of planning and development and Quality Assurance)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : सदर भरती च्या जाहिरात मध्ये कोणतीही वयोमर्यादा उपलब्ध करून देण्यात आली नाही.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क उपलब्ध नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,800/- रुपये ते 20,9200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | शॉर्टलिस्ट |
दुसरी फेरी | मुलाखत (Interview) |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचे ठिकाण : कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक – 422 222
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑक्टोंबर २०२५ ( दुपारी 3.00 वाजेपर्यंत )
YCMOU BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उपरोक्त वेतनश्रेणीमध्ये प्रतिनियुक्ती करीता पात्र असलेले अधिकारी/कर्मचारी यांनी विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. प्रतिनियुक्ती बाबतच्या अटी व शर्ती शासनाने वेळोवेळी जाहिर केलेले शासन निर्णयानुसार राहतील. अर्जाचा विहीत नमुना विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक – 422 222 या पत्यावर तसेच सॉफ्टकॉपी registrar@ycmou.ac.in या ईमेल वर कार्यालयीन वेळेत विद्यापीठाच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष सादर करावे.
- नियोजन अधिकारी या पदाच्या प्रतिनियुक्तीकरिता विद्यापीठ परिनियम क्र.11 (2 ऑफ 1993) अन्वये व इतर अनुषंगिक संबंधित तरतूदीनुसार नियुक्ती प्रथमतः 2 वर्षे आणि त्यानंतर एक वर्ष मा.व्यवस्थापन मंडळाच्या मान्यतेने नियुक्ती करता येईल. विहीत केलेला कालावधी संपताच प्रतिनियुक्ती आपोआप संपुष्टात येईल व सदरचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ अनुज्ञेय राहणार नाही.
- प्रतिनियुक्तीवर पदस्थापनेसाठी पदग्रहण अवधी हा शासनाने या संदर्भात वेळोवेळी केलेल्या नियमानुसार अनुज्ञेय राहील.
- अर्जदाराच्या मुळ नियोक्त्याकडून निर्धारित केलेल्या सेवा शर्ती व अटी लागूराहतील.
- स्वियेत्तर सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी अर्ज सादर करणारे अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचा अर्ज सादर करताना अर्जासोबत सेवेत सध्या कार्यरत असल्याचे कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. शासन सेवेत कार्यरत नसलेल्या व्यक्तींनी अर्ज करु नये.
- अर्ज सादर करण्याची मुदत जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 15/10/2025 अखेर (संध्या. 5.30 वाजेपर्यंत) राहील इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेला अर्ज,अटी, शर्तीचे पालन करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह विहीत
मुदतीत सादर करावेत. तसेच अर्जाची हार्ड कॉपी विद्यापीठ मुख्यालयाकडे समक्ष अथवा पोस्टाद्वारे दिनांक 16/10/2025 अखेर दुपारी 3.00 वाजेपर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठविण्यात यावी. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. - अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाचीच छाननी करण्यात येईल.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 457 जागांची भरती | येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.