NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने भरावयाचे असून पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये एकूण 042 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची नमुना खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
NHM Nashik Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 042 रिक्त जागा
भरती विभाग :राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | साथीचे रोग तज्ञ | 01 |
| 02 | सीपीएचसी-कन्सल्टंट | 01 |
| 03 | दंतवैद्य | 04 |
| 04 | वैद्यकीय अधिकारी (आयुष युजी) | 02 |
| 05 | वैद्यकीय अधिकारी आरबीएसके पुरुष | 08 |
| 06 | द्यकीय अधिकारी आरबीएसके महिला | 07 |
| 07 | वैद्यकीय अधिकारी BAMS (नव जन्मतारीख रुग्णवाहिका) | 01 |
| 08 | पोषणतज्ञ (आहारतज्ञ) | 02 |
| 09 | फिजिओथेरपिस्ट | 01 |
| 10 | समुपदेशक | 03 |
| 11 | लॅब टेक्निशियन | 02 |
| 12 | पॅरा मेडिकल वर्कर (एनएलईपी) | 02 |
| 13 | फार्मासिस्ट | 04 |
| 14 | दंत स्वच्छतातज्ज्ञ | 01 |
| 15 | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
| 16 | क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात पहावी.)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 60 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील पदांकरिता 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील पदांकरिता 100/- रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे, सदरचा डिमांड ड्राफ्ट “District Integrated Health & Family Welfare Society Nashik-Non PIP या नावे असावा, कोणत्याही कारणास्तव डिमांड ड्राफ्ट बँकेत न वठवलयास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | गुणांकन पद्धत |
| दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : नाशिक Jobs in Nashik)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवर,नाशिक
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
NHM Nashik Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
- पात्र/अपात्र यादी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथे नोटीस बोर्डवर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर प्रकाशित केल्या जाईल. याबाबत उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
- उमेदवारास गुणानुक्रमे 1:5 या प्रमाणात मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल.
- सदर पदांच्या बाबतीत पुढील सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या वरील वेबसाईटवरच प्रकाशित करण्यात येईल. त्याकरिता कोणताही पत्रव्यवहार कार्यालयतर्फे उमेदवारास केला जाणार नाही, त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अंतिम निवड होईपर्यंत सदर वेबसाईट पाहने हि उमेदवारांची जबाबदारी राही याची नोंद घ्यावी.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

