Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, उपवनसंवरक्षक,व्याघ्र,वनजीव विभाग यांचे कार्यालय विभागअंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे पाठवायचे आहेत. सदर भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Vanvibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र शासन, उपवनसंवरक्षक,व्याघ्र,वनजीव विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | MS-CIT प्रशिक्षक | 01 |
| 02 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) कोणताही शाखा/विषयात पदवीधारक, संगणक शाखातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल, MS-CIT अभ्यासक्रमकरिता प्रशिक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव ii) MS-CIT अनिवार्य, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट. iii) वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.02 : i) कोणताही शाखा/विषयात पदवीधारक, अनुषागिक क्षेत्रात काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव, GPS/GPRS/IT तज्ञ तसेच संगणक शाखातील पदवीधर यांना प्राधान्य दिले जाईल. ii) MS-CIT अनिवार्य, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट. iii) वनविभागात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | गुणांकन पद्धत |
| दुसरी फेरी | मुलाखत |
नोकरी चे ठिकाण : अकोला (Jobs in Akola)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनसंवरक्षक कार्यालय,मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग,अकोट, पोपटखेद रोड आकोट, जि.अकोला – 444101
ईमेल आयडी : dcf.akot@yahoo.com
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2025
Maharashtra Vanvibhag Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केलेला बायोडाटा व पदांकरिता असणारे सर्व कागदपत्रे pdf format मध्ये एकाच फोल्डर मध्ये वरील दिलेल्या ईमेल आयडी वर मेल करावे किवा वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्ट किवा स्वहस्ते पोचवावे.
- उमेदवारांनी कागदपत्रे सादर करताना मोबाईल क्रमाक नमूद करावा जेणेकरून या कार्यालयाद्वारे आवश्यक सूचना कळविण्यात येईल.
- सदर कंत्राटी पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता वरील पत्यावर हजर राहवे. एखादी बाब किवा अपूर्ण माहिती लक्षात घेता अथवा इतर कोणत्याही कारणास्तव कारण न दर्शवता उमेदवारास नाकारण्याचा अधिकार निवड समितीकडे राखून ठेवला आहे.
- सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप साठी 255 जागांची भरती सुरु ! Pune Municipal Corporation Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
