Mahatransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत “वीजतंत्री” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन नोंदणी करा

Mahatransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, सोलापूर अंतर्गत वर्ष 2024-25 करिता आय.टी.आय (विजतंत्री) शिकाऊ उमेदवारांची 01 वर्ष कालावधीसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी आवाहन केले आहे. भरती च्या अनुषंगाने खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीना अधीन राहून शैक्षणिक पात्रता. वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींसाठी खाली सविस्तर लेखात दिले आहे,तसेच संपूर्ण जाहिरात pdf व नोंदणी साठी ऑनलाईन लिंक दिली आहे. तसेच अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mahatransco Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

एकूण पदसंख्या : 063

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव (ट्रेड)एकूण पदसंख्या 
01विजतंत्री (Electrician)063

शैक्षणिक पात्रता :  i) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे :

  • एस. एस. सी गुणपत्रक / प्रमाणपत्र
  • आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका (चार सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • मागास वर्गात समाविष्ट असल्यास जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी (Domicile) प्रमाणपत्र
  • प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 38 वर्ष (मागास वर्गीयसाठी 05 वर्ष शिथिलता )

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : सोलापूर (Jobs In Solapur)

ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक : 11 जून 2024 

ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक : 21 जून 2024

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग,सोलापूर,प्रशासकीय इमारत 220 के.व्ही.बाळे उपकेंद्र आवार,अंबिकानगर बार्शीरोड बाळे, सोलापूर-413255 महाराष्ट्र 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 28 जून 2024 

Mahatransco Recruitment 2024 Important links

ऑनलाईन अर्ज नोंदणी येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • पद्संक्या कमी किवा जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार व्य्वाव्स्थापणेकडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळविणे व्यवस्थापनेस बंधनकारक राहणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी 100% प्रोफाईल अपडेट असल्याची खात्री करावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व एस.एस.सी गुणपत्रक / प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये उपलोड करणे बंधनकारक आहे, या बाबत अंतिम तारखेनंतर कोणतीही तक्रार एकूण घेतली जाणार नाही.
  • शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सदर करताना पोर्टलवर फोटो मूळप्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज सादर करावा. फोटो अथवा मूळप्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच अपूर्ण चुकीचे व अपुऱ्या कागदपत्रासह सादर केलेलं ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • शिकाऊ उमेदवारांची सही पालकांची सही प्रवर्ग जन्मतारीख एस.एस.सी मार्क, आयटीआय मार्क हि माहिती अचूक भरण्यात यावी सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही .
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !