Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कार्डिअक अम्बुलंस करिता “वैद्यकीय अधिकारी” व कुष्ठरोग करिता “लेप्रसी असिस्टंट” या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी एकत्रित मानधन तत्वावर सहा महिन्याच्या कालावधी करिता भरणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती ची निवड हि थेट मुलाखतीवर असून दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा
भरती विभाग : ठाणे महानगरपालिका Z
भरती श्रेणी : सार्वजनिक आरोग्य विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय अधिकारी | 11 |
02 | लेप्रसी असिस्टंट | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस) ii) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन असणे आवश्यक iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
- पद क्र.02 : i) महाराष्ट्र राज्य शासनाचे मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC) ii) शासकीय / निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील लेप्रसी असिस्टंट अथवा समकक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 ते 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये ते 40,000/- रुपये पर्यंत वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
मुलाखतीचा पत्ता : के.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन,सरसेनानी जनरल,अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे.
मुलाखतीचा दिनांक : 23 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण : ठाणे (jobs in Thane)
Thane Mahanagarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन अर्ज थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे.
- भरती साठी संपूर्ण माहिती वरील लेखात दिली आहे,तसेच अधिक माहिती साठी मूळ जाहिरात किवा अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
- उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये स्वयं साक्षांकित प्रमाणित करून सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहर्ता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
- शैक्षणिक अहर्ता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
- मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत 11 वाजता बोलाविण्यात आले आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !