Data Entry Operator Bharti 2024 : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय वाशिम यांच्या कार्यालय अंतर्गत कंत्राटी तत्वावर “डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे. सदर भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून प्रत्यक्ष अर्ज पोचविण्याचे आवाहन केले आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 23 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Data Entry Operator Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय वाशिम
भरती श्रेणी : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डाटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त असावा. ii) MS-CIT iii) टंकलेखन मराठी 30/40 iv) टंकलेखन इंग्रजी 30/40
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 16,000/- रुपये प्रती महिना वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत / टायपिंग टेस्ट
नोकरीचे ठिकाण : वाशिम (jobs in Washim)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑगस्ट 2024
Data Entry Operator Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज व जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती हि कंत्राटी पद्धत असून इच्छुक व पात्र उमेदवारांना वेळेत पोचतील अशा पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे.
- दिलेल्या वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- आवश्यकते नुसार कार्यालयीन वेलेशिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशीही काम करणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्वीकारल्या जाणार नाही.
- ई-मेल द्वारे तसेच प्रेषक शाखेद्वारे पोस्टाद्वारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !