Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु l येथे संपूर्ण माहिती वाचा

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत सिटी -को-ऑर्डीनेटर (शहर समन्वयक) या पदांसाठी हि भरती असून एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती ची निवड हि थेट समक्ष मुलाखतीवर होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच भरतीची जाहिरात हि महानगरपालिका कोल्हापूर यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी खाली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट दिली आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

एकूण पदसंख्या : 02

भरती विभाग : आरोग्य घनकचरा विभाग 

भरती श्रेणी : कोल्हापूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सिटी -को-ऑर्डीनेटर (शहर समन्वयक) 02

शैक्षणिक पात्रता : i) बी.ई. / बी.टेक कोणतीही शाखा ii) बी.आर्क iii) बी.प्लानिंग iv) बी.एस.सी. कोणतीही शाखा 

अनुभव : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शहर समन्वयक / स्वच्छ सर्व्हेक्षण/घनकचरा व्यवस्थापन/पर्यावरण विभागात काम करणेचा किमान सहा महिन्याचा अनुभव तसेच स्वच्छ भारत अभियान विषयीचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : 45,000/- रुपये दरमहा ठोक मानधन मिळेल.

हे पण वाचा : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत या पदांसाठी भरती l ऑनलाईन मुलाखतीवर होणार निवड l येथे आवेदन करा

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (jobs in kolhapur)

निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 जुलै 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Important links

ऑफलाईन अर्ज व जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • महानगरपालिका मुख्य इमारत ब्युरो व नोंदणी विभाग कोल्हापूर येथे सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 या कार्यालयीन वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करणेच आहे.
  • नियुक्ती हि ठोक मानधन व करारतत्वावर असून नियुक्ती करणेत आलेल्या उमेदवारास महानगरपालिका सेवेत कोणत्याही प्रकारे हक्क सांगता येणार नाही,तसेच कोणत्याही प्रकरे कायदेशीर दाद मागता येणार नाही तसेच कसल्याही प्रकारचे वेतन भत्ते अदा केले जाणार नाही.
  • अर्ज सादर करणारे उमेदवारांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता अर्जावर नमूद करणेच आहे.तसेच उमेदवारांनी अर्ज छाननी अंती पात्र व अपात्र यादि हि महानगरपालिकेच्या www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • या पदांसाठी जाहिरातीमध्ये दर्शविलेली अहर्ता अर्ज करतेवेळी उमेदवारांनी धरण केलेली असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने निर्धारित वेळेत उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख व वेळ अलहिदा कळविण्यात येईल.
  • मुलाखतीस उपस्थित राहणेपूर्वी शैक्षणिक अहर्ता व अनुभव अटी याबाबतची कागदपत्रे पूर्ण करतात या बाबत प्रथम खात्री करून घ्यावी.
  • जाहिरामध्ये नमूद केलेल्या पदांची कमाल वयोमर्यादा जाहिरात दिनांकास 35 वर्ष इतकी राहील.
  • या जाहिरातील नमूद केलेली पद्संख्य्या कमी-जास्त / रद्द करणेबाबत अधिकार मा.प्रशासक यांना राहतील.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे आपल्या मित्रांना पाठवा !