Anti Corruption Bureau Bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Anti Corruption Bureau Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा
भरती विभाग : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य
भरती श्रेणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti Corruption Bureau)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
02 | विधी अधिकारी गट – ब | 08 |
शैक्षणिक पात्रता :i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल,तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी गट ब या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. iii) उमेदवारास संबधित पदांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो संबधित कायद्याचे प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल. iv) उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान पुरेसे असणे आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 62 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर पदभरती हि 11 महिन्यासाठी करार पद्धतीवर
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड करताना प्रथम 50 गुणांची लेखी परीक्षा व 25 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल,लेखी व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करून एकूण गुणानुक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची कंत्राटी पद्धतीने नेमणूकीसंबधित कार्यवाही करण्यात येईल,तसेच नियुक्ती देण्यासाठी कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य मुंबई,सरपोचखानवाला रोड वरळी, मुंबई- 400030
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 14 डिसेंबर 2024
Anti Corruption Bureau Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF व अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीची आहे.
- उमेदवारांनी वर विहित केलेल्या शैक्षणिक अहर्ता,वयोमर्यादा व अनुभव या अटी अर्ज भरण्याच्या दिनांकास पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत पासपोर्ट आकराचे सध्याचे काढलेले व स्वाक्षरी केलेले 2 रंगीत फोटो जोडावेत.
- नियुक्ती केलेल्या उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम तरतुदीनुसार कोणतेही प्रकारची रजा देय असणार नाही.
- उमेदवाराने अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर घेऊन दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा ईमेल आयडी मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा कारण भरती संदर्भात येणाऱ्या संपूर्ण नोटीफिकेशन वेळेत मिळतील.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !