BMC Clark Bharti 2024 : मुंबई महानगर पालिकेत एकूण 1846 रिक्त पदांसाठी भरती ! पदवीधारकांना संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा !

BMC Clark Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील एकूण 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरवायची आहेत,त्यासाठी बृहन्मुंबई याच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. प्रस्तूत जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता / पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती साठीच्या अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 09 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

BMC Clark Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 1846 रिक्त जागा 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका 

भरती श्रेणी : सामान्य प्रशासन विभाग 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कार्यकारी सहायक (लिपिक)1846

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किवा तत्सम शाखाच पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. किवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. iii) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. iv) उमेदवाराजवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे किमान वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय – 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क :

  • अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदार : 1000/- रुपये 
  • मागासप्रवर्गातील उमेदवारांसाठी : 900/- रुपये 

(टीप – ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परत केले जाणार नाही. परीक्षा शुल्क ना परतावा आहे.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (TCS)

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 सप्टेंबर 2024 

BMC Clark Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • ऑनलाईन परीक्षेच्या वेळी सादर ई- पावतीची छायांकित प्रत प्रवेष्पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Post Office GDS Result 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची पहिली यादी जाहीर ! एवढ्या टक्केवारी वर पहिली यादी !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!