BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.बा.य.य.नायर धर्मा रुग्णालय व टो.रा.वैद्यकीय महाविद्यालयात Emergency Lab साठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील पदे हि कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरतीची संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात , ऑफलाईन अर्ज व अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
BMC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 018 रिक्त पदे
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC)
भरती श्रेणी : वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.SC) पदवी धारक करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची (Maharashtra State Board of Technical Education) ची डी.एम.एल.टी. पदविका (Diploma in Medical Laboratory Technology) उत्तीर्ण झालेला असावा. ii) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा वा तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्पात्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- इतके मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट व मुलाखत
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.य.नायर धर्मा रुग्णालय डॉ.ए.एल. नायर रोड,मुंबई सेन्ट्रल मुंबई – 400 008
BMC Recruitment 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- कंत्राटी तत्वावर भरण्यात येणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद नियमित स्वरूपातील नसून तात्पुरत्या स्वरुपात कंत्राट कालावधी करिता असेल.
- पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
- उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अहर्ता संबधित गुणपत्रिका प्रमाणित प्रत जोडावी.
- निवड झालेल्या उमेदवाराने 500/- रुपये च्या मुद्रक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
- विहित नमुन्यात सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज अलीकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चीटकून दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.