HSC Maharashtra Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत राज्यातील बारावीचा निकाल (HSC) आज दिनांक दुपारी 1:00 वाजता लागणर आहे,याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून (6 मे) महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या बारावी (HSC) वर्ग 2025 चा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यंदा 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या असून ते निकालाच्या तारखेची आणि मार्कशीट कधी हातात येईल याची हत आहेत. यावर्षी, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान घेण्यात आली.
HSC Maharashtra Result 2025 Links
लिंक 01 : https://www.mahahsscboard.in/ |
लिंक 02 : https://mahresult.nic.in/ |
लिंक 01 : https://hscresult.mkcl.org/ |
निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक तपासावे. मूळ गुणपत्रिका काही दिवसांनी शाळेतून उपलब्ध होईल. जर तुम्ही निकालांमुळे माधानी नसाल, तर तुम्ही जून 2025 मध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकता. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, ते जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षेला बसू शकतात. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवावा आणि बनावट बातम्यांपासून दूर रहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा