IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 01000 रिक्त जागा भरण्यात येणार असून नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. या भरती ची जाहिरात ही आयडीबीआय बँक (IDBI Bank) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
IDBI Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01000 रिक्त जागा
भरती विभाग : आयडीबीआय बँक अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) | 01000 |
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्यापिठातून पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : 07 नोव्हेंबर 2024 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1050/- रुपये SC/ST/PWD : 250/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,000/- रुपये ते 31,000/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : CBT (Computer Based Test) मुलाखत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 07 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 नोव्हेंबर 2024
IDBI Bank Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !