महाराष्ट्र शासन : कोंकण विभाग अंतर्गत लेखा आणि कोषागार विभाग अंतर्गत 0179 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! l KONKAN MAHAKOSH BHARTI 2025

KONKAN MAHAKOSH BHARTI 2025 : कोंकण विभाग अंतर्गत लेखा आणि कोषागार संचालनालय विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0179 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,सदर भरती ची जाहिरात ही कोंकण विभाग अंतर्गत लेखा आणि कोषागार संचालनालय विभाग यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

KONKAN MAHAKOSH BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0179 रिक्त जागा

भरती विभाग : कोंकण विभाग अंतर्गत लेखा आणि कोषागार संचालनालय

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ लेखापाल (गट क )0179 

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी. ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 मार्च 2025 रोजी किमान 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी खुला प्रवर्ग : 1000/- रुपये  मागासवर्गीय साठी 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 मार्च 2025 


KONKAN MAHAKOSH BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : AAI BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना करता येणार अर्ज


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!