SSC Maharashtra Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये 10वी ची परीक्षा झाली होती,आणि त्याच अनुसार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर,व कोंकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धती नुसार अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहिर करण्यात येत आहे. आणि त्याची लिंक/संकेतस्थळ खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
SSC Maharashtra Result 2025 Links
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mkcl.org
- https://results.navneet.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
वरील संकेतस्थळ चा वापर करून तुम्हाला परीक्षेचे प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
SSC Maharashtra Result 2025 सूचना
- ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (ई.10वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थीस स्वतच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत संबधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मागविता येणार आहे.
- फेब्रुवारी मार्च 2025 च्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना लगतच्या तीन संधी (जून -जुलै 2025 फेब्रु मार्च 2026 व जून जुलै 2026) श्रेणी गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
- जून जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी पुनरपरिक्षार्थी श्रेणीसुधार व खाजगी रित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थासाठी गुरुवार दिनांक 15 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत.
सूचना : शाळांना https://mahahsscboard.in (in School Login) या संकेतस्थळावरून एकत्रित निकाल व इतर सांखिकिय माहिती उपलब्ध होईल.
हे पण वाचा : Cochin Shipyard Limited Bharti 2025 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांची भरती सुरू! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..