District Co Operative Bank Bharti 2024 : भंडारा जिल्हा सेन्ट्रल को ऑपरेटिव्ह बँक लि.भंडारा या बँककरिता विविध श्रेणीतील सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 118 रिक्त पदे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक,संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
District Co Operative Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0118 रिक्त पदे
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लिपिक | 099 |
02 | शिपाई | 019 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- पद क्र.02 : कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास 21 वर्ष पूर्ण झाले असावे व 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवार, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास 21 वर्ष पूर्ण झाले असावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्गासाठी 885/- रु.अर्ज शुल्क आकारले जाईल.
- राखीव प्रवर्गासाठी 767/- रु.अर्ज शुल्क आकारले जाईल.
(सूचना – सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील.एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किवा इतर कोणत्याही परीक्षा किवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : भंडारा (jobs in Bhandara)
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व मुलाखत
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 ऑगस्ट 2024
District Co Operative Bank Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किवा सत्य माहिती दडवून ठेवल्यास निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांने ऑनलाईन अर्ज दाखल केला किवा तो त्या पदासाठीची अहर्ता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागदपत्रे पडताळणीस बोलाविण्याचा / नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
- उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांच्याकडून शिफारस दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
- उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उपरोक्त पात्रता निकष व निवड प्रक्रियेच्या निकषांमध्ये बँकेने बदल केल्यास सदर बदलानुसार कार्यवाही करण्यात येईल व तो बदल उमेदवारांवर बंधनकारक राहील.
हे पण वाचा : Nagar Parishad Recruitment 2024 : नगरपरिषद कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !