District Court Nagpur Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर नमूद केलेल्या पदांकरिता निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
District Court Nagpur Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline
एकूण पदसंख्या : 006 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर (District Court Nagpur)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सफाईगार | 006 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसायिक पात्रता : i) उमेदवार हा किमान इयत्ता 7वी उत्तीर्ण असावा.ii) उमेदवारांची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल. iii) उमेदवारास मराठी व हिन्दी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : i) सदर भरतीप्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे रुपये 300/- सर्व प्रवर्गासाठी असेल. ii) अर्ज शुल्क हे District And Session Court, Nagpur यांच्या नावे काढलेली रुपये 300/- ची पोस्टल ऑर्डर किवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करावे. iii) अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.iv) अर्ज शुल्क ना-परतावा असेल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 46,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)
निवड प्रक्रिया :
अ. क्र. | मूल्यांकन पद्धती | एकूण गुण | किमान पात्रता गुण |
01 | प्रात्यक्षिक परीक्षा | 30 | 15 |
02 | शारीरिक क्षमता चाचणी | 10 | 05 |
03 | वैयक्तिक मुलाखत | 10 | 05 |
04 | निवड प्रक्रियेचे एकूण गुण | 50 | 25 |
(सूचना : प्रात्यक्षिक चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारांच शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरतील.)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रती, माननीय प्रबंधक,जिल्हा व सत्र न्यायालय,नागपूर.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 एप्रिल 2025 (सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत)
District Court Nagpur Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
पात्र उमेदवारांच्या अटी :
- उमेदवारांचे चारित्र्य आणि वर्तवणूक चांगली असावी.
- उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा.
- उमेदवारास कोणतेही न्यायालय MPSC/UPSC किवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे.
- उमेदवारास हयात असलेल्या पत्नी/पती ची संख्या एकापेक्षा जास्त नसावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत.
- अर्ज पाठविताना पाकीटावर माळी पदांसाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे हि वाचा – MRVC BHARTI 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !