Maharashtra Homeguard Bharti 2025 : महाराष्ट्रात होमगार्ड पदांसाठी नविन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,आणि या भरती साठी तब्बल 02771 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी अटी व शर्ती ची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Homeguard Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 02771 रिक्त जागा
⚠️ अत्यंत महत्वाचे : सदर भरती हि फक्त मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरातील जिल्हा अंतर्गत राहणाऱ्या उमेदवारांना फक्त अर्ज करता येतील,इतर जिल्हातील उमेदवारांनी अर्ज केल्यास बाद ठरतील.
भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड विभाग (Maharashtra Homeguard)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | होमगार्ड | 02771 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता :
पुरुष | महिला | |
उंची | 162 से.मी. | 150 से.मी. |
छाती (फक्त पुरुष) | 76 से.मी. फुगवून 5 से.मी अधिक | – |
(⚠️ अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 कर्तव्य भत्ता व 200 रुपये उपहार भारर्त दिला जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : धावणे,गोळाफेक
नोकरीचे ठिकाण : मुंबई उपनगरी विभाग
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 फेब्रुवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जानेवारी 2025
Maharashtra Homeguard Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्र :
- रहिवासी पुरावा – आधार कार्ड,मतदान कार्ड
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुरावा – SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
- खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना – हरकत प्रमाणपत्र
- 03 महिन्याचा आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा