Mahavitaran Chandrapur Bharti 2026: महावितरण चंद्रपूर अंतर्गत 132 रिक्त पदांची भरती सुरू; दहावी आणि ITI पास उमेदवारांना सुवर्णसंधी

Mahavitaran Chandrapur Bharti 2026 : चंद्रपूर महावितरणने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण 132 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वीजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman) आणि कोपा (COPA) यांसारख्या विविध ट्रेडमधील उमेदवारांची निवड केली जाईल. तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, हा या भरतीचा मुख्य उद्देश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. महावितरण चंद्रपूर अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अधिकृत माहितीनुसार, या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक अडचण टाळण्यासाठी पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वीच अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mahavitaran Chandrapur Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 132 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  पदसंख्या 
01वीजतंत्री56
02तारतंत्री39
03कोपा37

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी (SSC) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये (Electrician/Wireman/COPA) आयटीआय (ITI) प्रमाणपत्र पूर्ण असणे बंधनकारक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जुलै 2026 रोजी पर्यन्त 18 ते 38 वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या शासनाच्या नियमांनुसार दरमहा निश्चित विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 ऑगस्ट 2026


Mahavitaran Chandrapur Bharti 2026 Links

  संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 
 WhatsAppजॉइन करा 
Telegramजॉइन करा 

आवश्यक कागदपत्रे :

  • 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • आयटीआय (ITI) उत्तीर्ण सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका व NCVT प्रमाणपत्र
  • आधार कार्ड (नाव व जन्मतारीख सुसंगत असणे आवश्यक)
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

अर्ज कसा करावा? : 

  • सर्वप्रथम उमेदवाराने केंद्र सरकारच्या अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टलवर (www.apprenticeshipindia.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर प्रोफाइल 100% पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
  • त्यानंतर ‘Establishment Search’ मध्ये जाऊन महावितरण चंद्रपूर (M distribution Co. Ltd. Chandrapur) शोधून संबंधित ट्रेडसाठी अर्ज करावा.
  • अधिकृत वेबसाईट आणि मार्गदर्शनासाठी उमेदवार MahaDiscom Official Website या लिंकला भेट देऊ शकतात.

हे पण वाचा : NGEL Bharti 2026: सरकारी नोकरीची मोठी संधी! NTPC मध्ये 114 जागांवर भरती सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी nmknokari.com या वेबसाईट ची सुरुवात केली. १०वी, १२वी पास ते पदवीधरांपर्यंत सर्वांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी शोधून देणे ही आमची जबाबदारी आहे. लेटेस्ट अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी मला फॉलो करा.

Leave a Comment