Maharashtra security force Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) अंतर्गत विविध विभागात नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. सुरक्षा महामंडळ मध्ये नोकरी करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून लवकर लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
Maharashtra security force Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यालयीन सहायक | 06 |
02 | संगणक तंत्रज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. ii) उमेदवार मराठी टायपिंग 30 श.प्र.मी. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मी. ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. iii) उमेदवार MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक iv) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिंस्ट या पदाचा खाजगी किवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान 03 वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
- पद क्र.02 : B.SC (Computer Science) / B.C.A / B.E (IT) or Equivalent Degree.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 25 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग पत्रलेखन नस्ती लेखन तसेच इतर संगणक बाबत परीक्षा घेण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्ती सह नियुक्ती पत्र दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in Mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2024
Maharashtra security force Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
हे आपल्या मित्रांना पाठवा